नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि राहतील! साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे उद्गार

सामना ऑनलाईन, भोपाळ

नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि राहतील असे उद्गार भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काढले आहेत.

अभिनेता कमल हासन याने महात्मा गांधी यांच्या हत्या करणारा नथुराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता असे विधान केले होते.

नथूराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी; कमल हासन यांचे वादग्रस्त वक्तव्य

त्याबाबत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हे उत्तर दिले आहे. नथुराम गोडसे यांना दहशतवादी म्हणणाऱ्यांनी जरा स्वत:चं परीक्षण करावं असा सल्लाही त्यांनी दिला आहे. गोडसे यांना दहशतवादी म्हणणाऱ्यांना या निवडणुकीत उत्तर मिळेल असंही त्या म्हणाल्या आहेत.

गोडसे पहिला ‘हिंदू दहशतवादी’ बोलणाऱ्या कमल हासनची जीभ छाटली पाहिजे!

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात यंदा ‘हिंदू दहशतवाद’ हा आक्षेपार्ह शब्द प्रामुख्याने चर्चेत रहिला आहे. आता या वादात अभिनेते आणि मक्कल निधी मियाम पक्षाचे प्रमुख कमल हासन यांनीही उडी घेतली होती. महात्मा गांधींची हत्या करणारा नथूराम गोडसे हा स्वतंत्र हिंदुस्थानातील पहिला हिंदू दहशतवादी होता, असे वादग्रस्त वक्तव्य कमल हासन यांनी केले होते. तामिळनाडूतील अरिवाकुरिची येथील एका सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. अरिवाकुरिची येथे होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीत हासन यांच्या पक्षाकडून एस. मोहनराज हे उमेदवार आहे. त्यांच्या प्रचारसभेत हासन बोलत होते.

या सभेत गांधीहत्येचा शोध घेण्याच्या हेतूने आपण बोलत आहोत. हा मुस्लीमबहुल भाग आहे. त्यामुळे आपण हे वक्तव्य करत नसून महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हे वक्तव्य करत असल्याचे ते म्हणाले. आपण मुस्लीमांची मते मिळवण्यासाठी हे विधान करत नसून हिंदू दहशतवाद हा गंभीर मुद्दा आहे. त्याकडे आपल्याला जनतेचे लक्ष वेधायचे आहे, असे ते म्हणाले. नथूराम गोडसे हा पहिला हिंदू दहशतवादी होता. त्याच्यापासूनच दहशतवादाची सुरुवात झाली असा दावाही हासन यांनी केला होता.

कमल हासन यांच्या या वक्तव्यावर भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मुस्लीमांची मते मिळवण्यासाठी हिंदूना दहशतवादी ठरवणे अयोग्य असल्याचे तामीळनाडूतील भाजप अध्यक्ष तामीळसाई सुंदरम यांनी सांगितले. कमल हासन यांना आज महात्मा गांधींची आठवण झाली. गाधींहत्येचा चुकीचा वापर करत आणि घटनेचा चुकीचा अर्थ काढत कमल हासन हिंदूना दहशतवादी ठरवत आहेत. मुस्लीमांची मते मिळवण्यासाठी हिंदूना दहशतवादी ठरवणे घातक आहे. कमल हासन हे आगीशी खेळत आहेत, असेही सुंदरम यांनी म्हटले होते.