राष्ट्रीय कबड्डीपटू दाजी बिरमोळे कालवश

6

सामना ऑनलाईन,सिंधुदुर्ग

बाबाजी (दाजी) बिरमोळे यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी घुमट-मालवण (सिंधुदुर्ग) येथे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. कबड्डी वर्तुळात ते दाजी बिरमोळे या नावानेच प्रसिद्ध होते. लोअर परेल-मुंबई येथील श्रीराम संघाकडून ते बाबाजी जामसांडेकर, दत्ता मालप यांच्या बरोबरीने खेळले होते. मुंबई, कटक, अमृतसर येथे झालेल्या तीन राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. छोटय़ा चणीचे असलेले दाजी बैठी लाथ मारून गुण वसूल करण्यात माहीर होते. ते किरकोळ शरीरयष्टीचे असल्यामुळे ताकदीपेक्षा युक्तीने गुण मिळवित. कल्पकता व संयम त्यांच्या खेळात असल्यामुळे विरुद्ध संघाचा अभ्यास करून ते गडी टिपत. गेले काही दिवस ते अर्धांगवायूच्या आजाराने त्रस्त होते.

आपली प्रतिक्रिया द्या