धावपटूंना रेल्वेत जमीनीवर झोपावे लागले!

46

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या राष्ट्रीय स्तरावरील धावपटूंना रेल्वेच्या अव्यवस्थेमुळे त्रास सहन करावा लागला आहे. ट्रेनमध्ये ३० तासांच्या प्रवासादरम्यान त्यांना उभं राहून, ट्रेनमध्ये जमीनीवर झोपून प्रवास करावा लागला असल्याचे एका खेळाडूने फेसबुकवरुन पोस्ट केले आहे.

स्पर्धेसाठी ३० धावपटू आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे गेले होते. ते रेल्वेने परतत होते. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांपैकी फक्त दोनच खेळाडूंचे तिकीट कन्फर्म झाले होते. बाकीच्या खेळाडूंचे प्रवासादरम्यान हाल झाले. तिकीट कन्फर्म नसल्यामुळे त्यांना ट्रेनमध्ये जमीनीवर झोपावे लागले. हा सर्व प्रकार धावपटू प्रदीप अत्रीने फेसबुकवरुन पोस्ट केला आहे. स्पर्धा काळात अनेक अडचणींचा सामना करणाऱ्या खेळाडूंना स्पर्धेनंतर रेल्वेतही अडचणींचा सामना करावा लागला.

स्पर्धा रद्द झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे दिल्ली अॅथेलॅटिक्स असोसिएशनचे सचिव संदीप मेहता यांनी सांगितले. स्पर्धा १० नोव्हेंबरला सुरू होणार होती, परंतु त्यात बदल झाल्याने ही तारीख १६ नोव्हेंबर करण्यात आली. आधीच्या तारखेनुसार सर्व खेळाडूंची तिकीटे विजयवाडा पर्यंत बुक करण्यात आली होती परंतु तारखेत बदल झाल्यामुळे ऐनवेळी तिकिटांचा बंदोबस्त करण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या