‘राष्ट्रीय पुरस्कार’ विजेत्या अभिनेत्याचा फ्रिजमध्ये मुक्काम, तुम्ही ओळखलं का?

2944

‘लहानपण देगा देवा…’ असे आपण नेहमीच बोलतो. लहान मुलांच्या बाललिला पाहून प्रत्येकाला आनंद होतो. सध्या बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असणाऱ्या अभिनेत्याचा लहानपणीचा असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत अभिनेता चक्क फ्रिजमध्ये बसलेला दिसत आहे. अतिशय गोंडस दिसणारा हा अभिनेता आहे ‘उरी’ फेम विकी कौशल याचा.

‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी विकी कौशल याला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर लहानपणीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विकी फ्रिजमध्ये बसल्याचे दिसत आहे. कुरळे केस, पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि चड्डी घातलेला विकी अतिशय गोंडस दिसत आहे.


View this post on Instagram

Fridge potato. Circa ‘88.

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

पुरस्कारानंतरची पोस्ट
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर विकी कौशलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून आपला आनंद व्यक्त केला होता. ‘मला झालेला आनंद मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. राष्ट्रीय पुरस्कारासाठी माझ्या नावाची घोषणा होणे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अविस्मरणीय क्षण आहे. ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातील माझ्या कामासाठी राष्ट्रीय पुरस्कार देऊन माझा गौरव करणाऱ्या पुरस्कार निवड समितीतील सर्व सदस्यांचे आभार’, असे या पोस्टमध्ये विकी कौशलने म्हटले.


View this post on Instagram

#66thNationalFilmAwards

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

आपली प्रतिक्रिया द्या