रेडीओग्राफर संघटनेची शिर्डीत राष्ट्रीय परीषद

गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीच्या साईबाबा मंदीरात फुलांची सजावट करण्यात आली आहे.

सामना प्रतिनिधी । शिर्डी

साईसमाधी शताब्दीचे औचित्य साधुन येत्या १ सप्टेबर ते २ सप्टेंबर दरम्यान साई रॅडकॉन या दोन दिवसीय राष्ट्रीय रेडीओग्राफर तज्ञांची परीषद शिर्डीत होत असल्याची माहिती या परीषदेचे आयोजक सचीव व साईनाथ रूग्णालयाचे रेडीओग्राफर वसंत लबडे यांनी दिली.

रेडीओग्राफर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (राम) यांच्या वतीने या रॅडकॉन २०१८ या दोन दिवसीय राष्ट्रीय परीषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या परीषदेस देशातील विविध नामांकित रूग्णालयातील तज्ज्ञ हजर राहुन मार्गदर्शन करणार आहेत़ या परीषदेचे उद्घाटन साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांच्या हस्ते १ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता होत आहे. या कार्यक्रमास मंहत उद्धव महाराज मंडलीक, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल, इंडीयन रेडीओग्राफर संघटनेचे अध्यक्ष डॉ़ त्रिलोकनाथ मिश्रा, रामचे अध्यक्ष विलास भदाणे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे लबडे यांनी सांगितले.