त्याची समुद्र भरारी

39

नॅशनल डिफेन्स ऍकॅडमीमधून (एनडीए) नौदलाचं प्रशिक्षण घ्यायची असंख्य तरुणांची इच्छा असते, पण त्या खडतर अभ्यासक्रमातून काही थोडेच यशस्वी होतात. देशभरातून कोर्ससाठी आलेल्या लाखो तरुणांमधून एनडीएने आपल्या १३३व्या स्पर्धेतून २३८ जणांना निवडलं. मुंबईतून त्यातला केवळ एकच विद्यार्थी सिलेक्ट झाला. तो आहे मराठमोळा कॅडेट सनील परुळेकर…

सनीलने २०१२ साली जुहूच्या प्रतिष्ठत जमनाबाई नरसी शाळेतून आयसीएसईच्या बोर्डाची परीक्षा ९५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण केली होती. अंधेरी लोखंडवालामध्ये राहणाऱ्या सनीलने लष्कराच्या सशस्त्र दलात सामील व्हायची इच्छा उराशी बाळगली होती. म्हणूनच त्याने वायुदलाच्या एनसीसी स्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि ‘ए’ प्रमाणपत्र मिळवले. त्याने जयहिंद कॉलेजमध्येही एनसीसी ‘बी’ आणि ‘ए’ प्रमाणपत्रांसह पूर्ण केलं होतं. त्याने मिठीबाई कॉलेजमधून बारावी सायन्स केल्यावर जेएनयू विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एनडीए कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.एससी. केलंय. क्षमता असेल तर कठीण मार्गही सोपा होतो हे सनीलने आपल्या कृतीतून दाखवून दिलंय.

आपली प्रतिक्रिया द्या