राष्ट्रीय पुरस्कारांत ‘कासव’ सुसाट, ठरला सुवर्णकमळाचा मानकरी

39

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

दिल्ली येथे जाहीर झालेल्या ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा बोलबाला पाहायला मिळाला. अनेक चित्रपटांच्या मांदियाळीत सुसाट ठरलेल्या ‘कासव’ या मराठी चित्रपटाला मानाचं सुवर्णकमळ मिळालं आहे. तर, सर्वोत्कृष्ट चित्रपटासह चार पुरस्कार मराठी चित्रपटांनी खिशात घातले आहेत. दशक्रिया हा मराठीमधला सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. राजेश मापुस्कर यांना व्हेंटिलेटर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. तर व्हेंटिलेटरने सर्वोत्कृष्ट संकलन आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंग यांसाठी पुरस्कार पटकावले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते ३ मे रोजी या पुरस्कारांचं वितरण होईल.

हे आहेत पुरस्कार विजेते-

 • सर्वोत्कृष्ट चित्रपट (सुवर्णकमळ) – कासव
 • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राजेश मापुस्कर (व्हेंटिलेटर)
 • सर्वोत्कृष्ट अभिनेता – अक्षय कुमार (रुस्तम)
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – मनोज जोशी (दशक्रिया)
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – झायरा वासिम (दंगल)
 • सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा – दशक्रिया
 • सर्वोत्कृष्ट वेशभूषा – सायकल
 • सर्वोत्कृष्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंग – व्हेंटिलेटर
 • सर्वोत्कृष्ट संकलन – व्हेंटिलेटर
 • सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – शिवाय
 • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- नीरजा
 • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – दशक्रिया
 • विशेष पुरस्कार – अभिनेत्री सोनम कपूर (नीरजा)
 • फिल्म फ्रेण्डली राज्य पुरस्कार- उत्तर प्रदेश
 • सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट – पिंक
आपली प्रतिक्रिया द्या