नॅशनल जिओग्राफीमध्ये दिसणार राष्ट्रपतींचे बॉडीगार्ड

सामना प्रतिनिधी, मुंबई

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नॅशनल जिओग्राफी वाहिनीने रविवारी वाहिनीतर्फे ‘द प्रेसिडेंट्स बॉडीगार्ड’ या डॉक्युमेंट्रीची घोषणा केली आहे. १४ ऑगस्टला राष्ट्रपती भवनात या डॉक्युमेंट्रीचा खास शो आयोजित करण्यात आला आहे. हिंदुस्थानच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला रात्री ९ वाजता ही डॉक्युमेंट्री नॅशनल जिओग्राफी वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी या डॉक्युमेंट्रीला आवाज दिला आहे.