महामार्गवरील खड्डे बुजवा अन्यथा तुमच्या कार्यालयात ख़ड्डे पाडू, नवनिर्मिती संघटनेचा इशारा

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील संगमेश्वर पुनर्वसन, कोळंबे, आंबेड बु. मानसकोड, सप्तलिंगी, बावनदी या ठिकाणी पडलेले मोठे मोठे खड्डे तत्काळ बुजवा अन्यथा कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, रत्नागिरी आणि एम. इ. पी. कंपनीच्या कार्यालयात येऊन खड्डे पाडू असा इशारा नवनिर्मिती संघटनेचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांनी दिला आहे.

राष्ट्रीय महामार्गवरील काही ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले असून त्यामुळे रोज अपघात होत आहेत. नवनिर्मिती या संघटनेचे कार्यकर्ते रोज रात्री अपरात्री या अपघातग्रस्त लोकांना मदत करत आहेत. पण संबंधित अधिकारी आणि कंपनी हे खड्डे भरण्यास कामचुकार पणा करत असल्याचे दिसत आहे. आंबेड बु. या ठिकाणी बसवण्यात आलेले पेवरब्लॉक तीन महिन्यापूर्वीच निघाले आहेत. त्या ठिकाणी आता मोठे मोठे खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यामुळे रोज चार चाकी गाड्यांचे टायर फुटत आहेत तर काही गाड्यांचे अपघात होत आहे. या खड्यांमुळे दुचाकी वरून पडून डोक्याला इजा झाली आहे. तर काहींचे हात -पाय मोडले आहेत. आता काय जीवितहानी होण्याची वाट पाहताय का? असा सवाल ही रमजान गोलंदाज यांनी संबंधिताना विचारला आहे.

राष्ट्रीय महामार्गवरील कित्येक वेळा पडलेले खड्डे नवनिर्मिती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी भरले आणि खड्डे भरले. जर 26 जानेवारीच्या आत खड्डे भरले नाहीत, तर त्याच खड्ड्यात वृक्षारोपण करू आणि कार्यालयात येऊन खड्डे पाडू. राष्ट्रीय महामार्गावरून जाणारी लोक ही वेग वेगळ्या जिल्ह्यातून आलेली असतात त्यांच्या गाडीचे टायर फुटले कि त्यांना रात्रभर रस्त्यावर काढावी लागते. हिच वेळ अधिकारी आणि संबंधित कंपनीच्या लोकांवर आली म्हणजे इतरांचे काय हाल होतात? ते त्यांना कळेल. ही वेळ येण्यापूर्वी खड्डे भरा अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल, असे ही गोलंदाज यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या