नॅशनल हॉर्स रायडर तरूणीची आत्महत्या, इमारतीच्या 11 मजल्यावरून मारली उडी

राष्ट्रीय घोडेस्वार असलेल्या तरूणीने इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड सिटीत घडली. श्रीया गुणेश पुरंदरे (वय – 17, रा. डी- मधुवंती, नांदेड सिटी) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

रविवारी सकाळी नऊच्या सुमारास श्रीयाने नांदेड सिटीतील मधुवंती इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून खाली उडली मारून आत्महत्या केली. त्याचवेळी गॅलरीत व्यायाम करणारे अभिजीत देशमुख यांना काहीतरी जोरात खाली पडल्याचा आवाज आला. त्यांनी खाली पाहिले असता मुलीच्या वर्गात शिकणारी श्रीया पडल्याचे दिसून आले. त्यांनी घटनेची माहिती हवेली पोलीस ठाण्याला दिली. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी घटनास्थळी धाव घेतली असता श्रीयाचा मृतदेह आढळून आला. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून हवेली पोलिसांकडून आत्महत्येचा तपास केला जात आहे.

वडिलांची हॉर्स रायडिंग अ‍ॅकॅडमी

श्रीया हिच्या वडिलांची हॉर्स राडींगची अ‍ॅकॅडमी आहे. बालपणीपासून श्रीया हॉर्स रायडींगचे धडे घेत होती. राज्य व राष्ट्रीय पातळीवर तिने अनेक पारितोषिके पटकावली आहेत. तिने इतके टोकाचे पाऊल का उचलले याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या