राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा, महाराष्ट्राचा 28 खेळाडूंचा संघ जाहीर

भुवनेश्वर येथे 15 ते 19 जून या कालावधीत पार पडणाऱ्या ‘राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धे’साठी महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. राजपथ महाराष्ट्र वरिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी सतीश उचिल यांनी दिली.

महाराष्ट्र संघ पुढीलप्रमाणे
पुरुष गट : 100 मीटर आणि 4 बाय 100 रिले स्पर्धा : प्रणव गुरव (पुणे), सौरभ नैताम (अकोला), जय शहा (मुंबई उपनगर). 400 मीटर : शुभम देशमुख (सातारा). 800 मीटर : प्रकाश गदादे (सांगली). 200 मीटर, 400 मीटर आणि 4 बाय 100 मीटर : राहुल कदम (मुंबई उपनगर). 1500 मीटर : ओमकार कुंभार (कोल्हापूर). 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यत : तेजस शिरसे (छत्रपती संभाजीनगर). 3000 मीटर स्टिपलचेस : शुभम भंडारे (नाशिक), सिद्धांत पुजारी (कोल्हापूर), राजन यादव (नागपूर). उंच उडी स्पर्धा : सर्वेश कुशरे (नाशिक). भालाफेक स्पर्धा : उत्तम पाटील (सांगली), अक्षय घोंगे (मुंबई शहर). डिकॅथलॉन