
प्रवाशांना घेऊन जाणारी बोट कोसा नदीत उलटल्याची घटना मंगळवारी घडली. बोट नदीत पलटल्याने अनेक जण पाण्यात वाहून गेले. सर्व गावकरी हिरवे मूग काढण्यासाठी नदी पार करत होते. नदीत बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. गावकऱ्यांनी 4 ते 5 जणांना वाचवले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, बिहारमधील सुपौल येथे बनेनिया घाटावरून पालारकडे गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट कोसी नदीत उलटली. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळते. किनाऱ्यावरील गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेत 4 ते 5 जणांना पाण्यातून बाहेर काढले. सर्वांना उपचारासाठी सराईगढ सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
बोटीतील लोकांची नेमकी संख्या अद्याप कळलेली नाही. घटनेची माहिती मिळताच, सीओ भापतियाही आणि एसएचओ ब्रिजेश कुमार दुबे त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सध्या, स्थानिक डायव्हर्स आणि बचाव पथकांच्या मदतीने बेपत्ता लोकांना शोधण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.


























































