नवीन संसद भवनाला गळती, आता खासदारांच्या लॉबीत माकडाची एन्ट्री

नवीन संसद भवनाला गळती लागली होती. या मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले होते. आता संसद भवनातील खासदारांच्या लॉबीत माकडाची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे संसदेच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संसदेत शुक्रवारी बजेटवर चर्चा सुरू होती. त्यावेळी अचानक खासदारांच्या लॉबीत एक माकड शिरले. त्या ठिकाणी काहीजण बसले होते. त्यापैकी एकाने या घटनेचा व्हिडीओ बनवून तो सोशल मिडीयावर व्हायरल केला. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

या व्हिडीओमध्ये एक माकड खासदारांच्या लॉबीत शिरलेले दिसत आहे. ते एका सोफ्यावर बसते. तसेच लॉबीमध्ये आणि परिसरात दंगामस्ती करताना दिसते. लॉबीच्या परिसरात काहीजण बसलेले दिसत आहे. त्यांच्यापैकी एकाने या घटनेचे व्हिडीओ बनवून तो व्हायरल केला आहे. त्यामुळे या व्हिडीओची चर्चा होत आहे. याआधीही जी 20 संमेलनादरम्यान संसदेत माकडे शिरल्याची घटना घडली होती.

या माकडाने खासदरांची लॉबी आणि परिसरात दंगामस्ती केली असली तर त्याने कोणावरही हल्ला केला नाही. मात्र, या घटनेमुळे संसदेच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना संसद परिसरात आणि थेट खासदारांच्या लॉबीपर्यंत माकड कसे पोहचले असा प्रश्न उपस्थित होत आहे. राजधानी दिल्लीत नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने संसद भवनाला गळती लागली होती. विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारला घेरले होते. त्यानंतर लगेचच ही घटना घडल्याने याची चर्चा होत आहे.