कांदा प्रश्नावरून विरोधक आक्रमक, संसदेच्या पायऱ्यांवर केली घोषणाबाजी

कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात आहे. त्यामुळे कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी, कांद्याला एमएसपी मिळावा, या मागण्या विरोधकांनी लावून धरल्या आहेत. कांदा उत्पादकांच्या पर्शनावरून गुरुवारी विरोधकांनी संसदेच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केलं. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार निलेश लंके, राज्यसभेच्या खासदार फौजिया खान, काँग्रेस खासदार रजनी पाटील उपस्थित होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या खासदारांची भेट देऊन सविस्तर चर्चा केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)