राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवर टांगती तलवार

424

कोरोनामुळे आता हिंदुस्थानातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांवरही टांगती तलवार ठेवण्यात आली आहे. या देशातील बहुतांशी राष्ट्रीय क्रीडा संघटनांना स्थानिक स्पॉन्सर्स मिळणे मुश्किल झाले आहे. तसेच केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून मिळणाऱ्या निधीत ही स्पर्धा यशस्वी पार पडू शकत नाही. एकढेच नव्हे तर आता खेळाडूंच्या कोरोना टेस्टसाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. अशा परिस्थितीत कोरोना संकटानंतर राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी या क्रीडा संघटनांना तारेवरची कसरत करावी लागेल हे निश्चित.

सीनियर चॅम्पियनशिपसाठी 12 ते 15 लाखांचा खर्च

कोणत्याही खेळाच्या सीनियर राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनासाठी 12 ते 15 लाखांचा खर्च होतो. तसेच सब ज्युनियर व ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धांसाठी 25 ते 30 लाख रूपयांचा खर्च करण्यात येतो. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात येणारा निधी हा त्यामानाने खूप कमी असतो.

खेळाडूंवर होणार अधिक खर्च

याआधी हॉटेलमधील एका रूममध्ये पाच ते सहा खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था केली जात होती. आता कोरोनामुळे एका रूममध्ये एकच खेळाडूला ठेवता येणार आहे. त्यानंतर खेळाडूंना स्टेशनपासून रूम व त्यानंतर ग्राऊंडपर्यंत नेण्यासाठी एका स्पेशल बसची सोय करावी लागणार आहे. याशिवाय क्रीडासाहित्यापासून सर्वच बाबींना सॅनीटाईज करावे लागणार आहे. एकूणच काय तर खेळाडूंवरील खर्च वाढणार आहे.

क्रीडा मंत्रालयाकडून देण्यात येणारा निधी

सीनियर स्पर्धा – पाच लाख रुपये
ज्युनियर स्पर्धा – सात लाख रुपये
सब ज्युनियर स्पर्धा – 10 लाख रुपये

आपली प्रतिक्रिया द्या