राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मंत्रालयात प्रतिज्ञा

334

‘राष्ट्रीय मतदार दिना’निमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी उपस्थितांना प्रतिज्ञा दिली.

प्रारंभी अतिरक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी माहिती दिली की, भारत निवडणूक आयोगाने ‘सक्षम लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता’ ही यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाची संकल्पना निश्चित केली आहे. मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु असून, दिनांक 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवा वर्गाने आपली नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मतदार दिनाची प्रतिज्ञा घेण्याच्या कार्यक्रमाप्रसंगी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सतीश जोंधळे, सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद दळवी, आबासाहेब कवळे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या