इंडिगो एअरलाइन्सविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

38

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

विमानसेवा देणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीचे रहिवाशी प्रमोद कुमार जैन यांनी ही तक्रार केली आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या एका कर्मचाऱ्याने हिंदुस्थानी चलन घेण्यास नकार दिल्यामुळे कंपनीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील सरोजीनी नगर पोलिस स्थानकामध्ये कलम १२४(अ) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळचे दिल्लीचे रहिवासी असलेले प्रमोद कुमार जैन १० नोव्हेंबरला बंगळुरू विमानतळावरुन इंडिगोच्या ६ई९५ या विमानाने दुबईला जात होते. त्यांच्या तिकिटातात जेवण नसल्याने त्यांनी जेवणाची वेगळी ऑर्डर दिली. त्या ऑर्डरचे पैसे देत असताना विमानातील कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून पैसे घेण्यास नकार दिला आणि आम्हाला फक्त विदेशी चलन स्वीकारण्याची परवानगी आहे, असे सांगितले. जैन यांनी वारंवार विनंती करूनही कर्मचाऱ्याने पैसे घेतले नाही.

हिंदुस्थानी चलन घेत नाही!

आंतराष्ट्रीय विमानसेवेदरम्यान आम्ही हिंदुस्थानी चलन घेत नाही; असे इंडिगो कंपनीने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या