केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सामान्यांना बसणार फटका, सीएनजी पीएनजीचे दर वाढणार

केंद्र सरकारने नैसर्गिक गॅसच्या किमतीत रेकॉर्डब्रेक अशी तब्बल 40 टक्क्यांनी वाढ केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा आता थेट सर्व सामान्यांना फटका बसणार आहे. नैसर्गिक गॅसच्या किमतीत वाढ झाल्याने त्यामुळे सीएनजी व पीएनजीच्या दरात देखील मोठी वाढ होणार असल्याची शक्यता आहे. सीएनजी व पीएनजीचे दर वाढले तर त्यामुळे सामान्यांच्या खिशावर मोठा भार पडणार आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेल (PPAC) च्या आदेशानुसार, सध्या नैसर्गिक वायूच्या एका युनिटची किंमत $ 6.1 (सुमारे 500 रुपये प्रति युनिट) आहे, जी 8.57 डॉलरपर्यंत वाढली आहे. (सुमारे 700 रुपये) प्रति युनिट.