पक्षी आणि फळझाडे

164

>>ज्ञानेश्वर भि. गावडे<<

२००२मध्ये मुंबईत आंतरराष्ट्रीय पक्षी तज्ञांची जागतिक बैठक भरली असता जगात १९८० आणि देशातील ७९ पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या बेतात आहेत. एव्हाना १५ वर्षे झाल्यामुळे म्हणण्यानुसार काही प्रजाती नष्टच झालेल्या असाव्यात. कारण पक्षीप्रेमींच्या म्हणण्यानुसार पक्ष्यांकडे लोकांचे कमालीचे दुर्लक्ष, त्याशिवाय पर्यावरणाचा वाढता उपद्रव, पक्ष्यांची शिकार, अन्नपाण्याचे दुर्भिक्ष आदींनी पक्ष्यांची संख्या घटत आहे. मुंबईत घाणीवर जगणारे कावळे व कबुतरे सोडली तर इतर पक्षी दिसतच नाहीत. धारावीच्या पक्षी अभयारण्यातही पक्षी फिरकण्याचे कमी झालेले आहे. गेली अनेक वर्षे मुंबईत विदेशी झाडे लावण्याकडे कल होता आणि पोरेटोरे दगड मारतील व चोऱ्या होतील म्हणून मुंबई महापालिकेने फळांची झाडे लावण्याची व जतन करण्याची प्रथा बंद केली आहे. म्हणून अशा दुःस्थितीत विचार करून मुंबई महापालिका प्रशासनाने या पावसाळय़ात मुंबईत देशीच झाडांची लागवड करण्याचे महापालिकेत ठरविले आहे. त्यातही विविध प्रकारच्या पक्ष्यांना आकर्षित करतील आणि त्यांना खाद्य मिळेल अशी फळझाडे लावण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मुंबईकरांनीही सोसायटय़ांच्या आवारात आणि खासगी संस्था, आस्थापना आणि शासकीय व निमशासकीय जागांवर फळझाडांची लागवड करावी असे आवाहन केले आहे. गेली काही वर्षे विदेशी झाडे लावण्याकडे कल असल्यामुळे पक्षी अशा झाडांवर खाद्य मिळत नाही म्हणून येत नाहीत असे पर्यावरणवाल्यांचे म्हणणे आहे. तशात विदेशी झाडांमधील, विशेषतः पर्जन्यवृक्षांना मोठय़ा प्रमाणात साथीचा रोग झाल्यामुळे  बरीचशी लागण झाली आहे. फळझाडे आणि त्याबरोबरच फुलझाडेही लावण्यात यावीत. त्यायोगे फुलपाखरांचीही सोय होईल. फुलांमुळे वातावरण शांत, शीतल राहील.

आपली प्रतिक्रिया द्या