जहांगीर कलादालनात निसर्ग चित्रप्रदर्शन

66

नाशिकचे छायाचित्रकार अनिल माळी यांच्या प्राणी आणि निसर्गावरील छायाचित्रांचे प्रदर्शन काळा घोडा येथील जहांगीर कला दालनात १५ ते २१ मार्च दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. माळी यांना बालपणापासून निसर्गाची ओढ व वन्य प्राणी जीवनाबद्दल उत्सुकता असल्यामुळे या विषयावरील छायाचित्रे काढण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी प्रवास केला.

यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्प, पेंच अभयारण्य, कान्हा अभयारण्य, रणथंबोर अभयारण्य, वेलवदरा अभयारण्य, भरतपूर केवलादेव (घाना पक्षी अभयारण्य), खेजडिया पक्षी अभयारण्य, सुंदरवन अभयारण्य, चिल्का लेक, नल सरोवर, मोकार सागर (पोरबंदर) इत्यादींचा समावेश आहे. या प्रदर्शनात त्यांनी वन्य प्राणी व पक्षी यांच्या जीवनाची वैशिष्ट्ये, निसर्गाच्या सहवासात घालवलेल्या काही क्षणांच्या रम्य आठवणी आपल्या छायाचित्रातून टिपल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या