‘नवा शुक्रतारा’ प्रेक्षकांच्या भेटीला

अरूण दाते

>> सामना प्रतिनिधी 

प्रतिभावान गायक अरुण दाते यांचा 6 मे रोजी पहिला स्मृतिदिन आहे. यानिमित्त त्यांना सांगीतिक श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. यासाठी आज प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह, बोरिवली येथे रात्री 8.30 वाजता तर 5 मे रोजी मराठा मंडळ, मुलुंड (पूर्व) येथे सायंकाळी 5.30 वाजता ‘नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गायक मिलिंद इंगळे अरुण दाते यांनी गायलेली काही गीते सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना अतुल दाते यांची असून ते काही किस्से आणि आठवणीही रसिकांसमोर उलगडणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या