घाटसावळीत नवनाथ बाबांचा ऎतिहासिक महागुरुपुजन सोहळा

297

सामना प्रतिनिधी । घाटसावळी

अत्यंत भक्तीमय वातावरणात श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडीचे मठाधिपती नवनाथ बाबा यांचा गुरुपुजन सोहळा तब्बल १२ तास महापुजा, महाप्रसाद व भव्य शोभायात्रा ५० हजार भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडला. सर्व भक्तगण या महासोहळ्यात गुरुभक्तीमध्ये सामिल होऊन आपला आनंद व्दिगुणीत करत होते. या प्रसंगी अनेक मंहत तसेच जिल्ह्यातील राजकिय नेत्यांनी आपली उपस्थिती लावली होती.

 

gurupujanश्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे लोकांची अपार श्रध्दा आहे. थोर संत किसन बाबांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या टेकडीचा महिमा जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण राज्यात सर्वश्रुत आहे. या ठेकडीचे मठाधिपती ह.भ.प. नवनाथ बाबा यांनी चारधाम यात्रा पूर्ण केल्याचे औचित्य साधून घाटसावळी येथील ग्रामस्थांनी गुरुपुजन सोहळा करायचे ठरवले. तब्बल एक महिन्यापासुन या गुरुपुजन सोहळ्याची तयारी करण्यात येत होती.

या भव्यदिव्य गुरुपुजन सोहळ्याची सुरुवात सकाळी ७ वाजता ग्रामदैवत हनुमानाला नवनाथ बाबांच्या हस्ते जलाभिषेक करुन झाली. आठ वाजता गावात हत्तीवरुन भव्य मिरवणुकीस सुरुवात झाली. दारादारात सुंदर रांगोळी काढून रस्ते सजवले होते. महिला बाबांच्या अंबारीवर पुष्पवृष्टी करत होत्या. हत्तीच्या सोंडेतुनही पुष्पवृष्टी करण्यात येत होती. तब्बल चार तासांच्या मिरवणुकीनंतर बाबांचे आगमण भव्य अशा मंडपात झाले. या ठिकाणी दत्त पद्दनाथ पीठ, श्रीक्षेत्र तपोभुमी, गोवा येथील वेदविद्वान, उपाध्यायांच्या पौराहित्याखाली सरस्वती वाचन, श्री गुरुवंदना, गणपती पुजन, गुरुमहापाध्यपुजा, द्रव्याभिषक, दिव्य दिपसाधना, महाआरती आशिर्वाद मंत्र, मधुपर्क इत्यादी पौरोहित्यांच्या हस्ते विधीवत कार्यक्रम करण्यात आले. सकाळी मारुतीरायाचा अभिषेक होताच आठ वाजल्यापासुन महाप्रसादाला सुरवात झाली. रात्री आठ वाजेपर्यंत पन्नास हजार भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. दुपारी तीन वाजल्यापासुन ह.भ.प. नवनाथ बाबांची बीड-परळी राज्यमहामार्गावरुन हत्तीवरुन मिरवणुक काढण्यात आली.

 

gurupujan-1 रात्री आठ वाजता या दिव्य शोभायात्रेची सांगता झाली. या गुरुपुजन सोहळ्याला आ. जयदत्त क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे, सचिन मुळुक, जि.प. सदस्य संदिपभैय्या क्षीरसागर, जि.प.सदस्य गंगाधर घुमरे, भाऊसाहेब डावकर, अरुण डाके, दिनकर कदम (सभापती), सखाराम मस्के, शिसेना युवा नेते नितीन धांडे, बप्पासाहेब घुगे, अँड. राजेंद्र राऊत इत्याची मान्यवरांनी या कार्यक्रमास हजेरी लावली. मुस्लीम बांधवांचीही बाबांवर आपार श्रद्धा असुन या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या पिण्याच्या पाण्याची जागोजागी व्यवस्था मुस्लीम बांधवांच्या वतीने दिवसभर करण्यात आली. रात्री नऊ ते अकरा ह.भ.प. स्वामी अखंडानंद गिरी महारांजाच्या किर्तनाने या गुरुपुजन सोहळ्याची सांगता झाली.

आपली प्रतिक्रिया द्या