नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवरायांचे नाव द्या, राज ठाकरे यांची भूमिका

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मांडली.

नवी मुंबईतील विमानतळाच्या नामकरणाच्या संदर्भात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ‘कृष्ण कुंज’ निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव देण्याची भूमिका घेतली. विमानतळाच्या नामकरणाबाबत गरज लागल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू असेही राज ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या