वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या ‘झोमॅटो गर्ल’वर गुन्हा दाखल, अटकेची कारवाई

2312

सध्या सोशल मीडियावकर वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या एका ‘झोमॅटो गर्ल’चा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नवी मुंबईतील वाशीमधील हा व्हिडीओ असून यात मुलगी पोलिसांना शिवीगाळ करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ मुंबई पोलिसांपर्यंत पोहोचला असून मुलीवर भादवि. कलम 353, 393, 294, 504, 506 अंतर्गत वाशी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिला अटकही केली आहे. अटक करण्यात आलेल्या ‘झोमॅटो गर्ल’चे नाव प्रियंका मोगरे आहे.

काय आहे प्रकरण ?
व्हायरल होणारा हा व्हिडीओ 8 ऑगस्ट रोजीचा आहे. नवी मुंबईतील वाशी या ठिकाणी सेक्टर नऊमधील हा व्हिडीओ असून या मुलीने तिची दुचाकी शिस्त मोडून उभी केली होती. यानंतर वाहतूक पोलिसांनी कारवाईसाठी दुचाकीचा फोटो काढल्यावर मुलीने त्यांच्याही हुज्जत घालण्यास सुरुवात केली. तसेच पोलिसांना कारवाईपासून रोखले आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. याचा व्हिडीओ वाहतूक पोलिसांनी आपल्या मोबाईक कॅमेऱ्यात कैद केला आणि व्हायरल केला.

व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर याची दखल मुंबई पोलिसांनी घेतली. वाहतूक पोलिसांनी याची रितसर तक्रार केल्यानंतर पोलिसांनी झोमॅटो कंपनीशी संपर्क साधून मुलीचे नाव, पत्ता जाणून घेतला आणि तिला अटक केली. सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ला, लुटीच्या दृष्टीने अंगावर धावून जाणे, पोलीस हुकूम न मानणे, सरकारी कामात व्यत्यय आणणे या गुन्ह्यांची कलमं या मुलीवर लावण्यात आली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या