मुलांसाठी हृदय तपासणी शिबीर

नवी मुंबई येथील रिलायन्स हॉस्पिटलने शून्य ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी निशुल्क हृदय तपासणी शिबिराचे आयोजन 26 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता केले आहे. हे शिबीर खासकरून अशा मुलांसाठी आहे ज्यांना यापूर्वी हृदयविकार किंवा सर्जरी झाली होती किंवा ज्या मुलांना श्वसनसंबंधी समस्या आहेत. अशी मुले या शिबिरात येऊन तपासणी करून घेऊ शकतात. शिबिरात हृदय विशेषज्ञ सहभागी होतील आणि प्रशिक्षित व्यावसायिक टू डी इको व फीटल इको या सेवा निशुल्क पुरवतील. नोंदणीसाठी संपर्क – 7304467773

आपली प्रतिक्रिया द्या