अब मैं हू ‘कॅप्टन’…! पंजाब काँग्रेस अध्यक्ष बनताच सिद्धूची सलामीला ‘फटकेबाजी’

नवज्योत सिंग सिद्धू शुक्रवारी पंजाब काँग्रेसचे नवे ‘कॅप्टन’ बनले. काँग्रेस भवनातील पदग्रहण सोहळ्यात सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्ष तर कुलजीत नागरा, सुखविंदर सिंग डॅनी, संगत सिंग व पवन गोयल यांनी कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. सिद्धू यांना अध्यक्ष बनवण्यास विरोध करणारे मुख्यमंत्री पॅप्टन अमरिंदर सिंग हेही या सोहळ्याला हजर होते. मात्र सिद्धूंनी त्यांच्याकडे नजरही न फिरवता आता आपण ‘पॅप्टन’ असल्याच्या जोशात सलामीलाच ‘फटकेबाजी’ केली.

जवळपास दीड तास चाललेल्या सोहळ्यात पॅप्टन अमरिंदर आणि सिद्धू हे व्यासपीठावर शेजारीशेजारी बसले होते. परंतु दोघांमध्ये कोणतीच चर्चा झाली नाही किंवा दोघांची नजरेला नजर मिळाली नाही. अमरिंदर यांनी नरमाईची भूमिका घेत त्यांच्या भाषणात सिद्धू व त्यांच्या कुटुंबीयांचा उल्लेख केला. परंतु सिद्धूंनी नाराजीचा इंगा दाखवत आपल्या भाषणात अमरिंदर यांचे नावही घेतले नाही. त्यामुळे दोघांमधील दुरावा संपला नसल्याचेच दिसले. सोहळ्यात पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरिष रावत यांच्यासह पक्षाचे अनेक आमदार, पंजाब सरकारचे मंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष व इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. सिद्धू यांनी गुरुवारी अमरिंदर यांना व्यक्तिगत निमंत्रण पाठवले होते. त्यामुळे अमरिंदर व त्यांच्या पत्नी तथा पटियालाच्या खासदार प्रेनीत काwर, माजी मुख्यमंत्री राजिंदर काwर भट्टल तसेच इतर नेते आधीच व्यासपीठावर दाखल झाले होते. परंतु सिद्धू यांनी जवळपास 15 मिनिटे उशिराने हजेरी लावली. त्यामुळे सोहळाही उशिराने सुरू झाला.

सोहळय़ात दिसलेली सिद्धूंची नाराजी

– व्यासपीठावर शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या अमरिंदर यांनी सिद्धूंशी बोलण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र सिद्धू यांनी त्यांच्याकडे दुर्लक्षच केले.

– पक्षातील ज्येष्ठ नेते असलेल्या अमरिंदर यांच्यासमोरच सिद्धू हे माजी मुख्यमंत्री राजिंदर काwर भट्टल, माजी प्रदेशाध्यक्ष लालसिंह यांच्यापुढे नतमस्तक झाले व पुन्हा तडक स्वतःच्या खुर्चीवर जाऊन बसले.

– सकाळी अमरिंदर यांनी आमदार, मंत्री, नेत्यांसाठी चहापानाचा कार्यक्रम ठेवला. मात्र त्या कार्यक्रमालाही सिद्धू उशिराने पोचले होते.

आपली प्रतिक्रिया द्या