नवज्योत सिंह सिद्धू आम आदमी पार्टीत जाणार?

1068

क्रिकेटपटू व काँग्रेस आमदार नवज्योत सिंह सिद्धू यांचे आता काँग्रेसमध्ये देखील वाद होत असल्याने आता ते आम आदमी पार्टीत जाणार असल्याची चर्चा आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी याबाबत संकेत दिले आहेत. असं समजतं की प्रशांत किशोर हे सिद्धूसाठी आपसोबत चर्चा करून मध्यस्थी करत आहेत.

एका न्यूज चॅनेलसोबत बोलताना केजरीवाल म्हणाले,’ नवज्योत सिंह सिद्धू यांचे कायम आम आदमी पार्टीत स्वागत असेल’ असे सांगितले. 2022 ला पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक आहे. त्याआधी सिद्धूला आपमध्ये सामिल करण्याचा प्रशांत किशोर यांचा प्लान असल्याचे समजते. मात्र प्रशांत किशोर हे अमरिंदर सिंग यांच्यासाठी आगामी निवडणूकीची योजना आखत आहेत. त्यामुळे हे कसे शक्य आहे अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी असे काहीही नसल्याचे सांगितले आहे. ‘सिद्धू हे काँग्रेस पक्षातच आहेत. मी स्वत: प्रशांत किशोर यांच्यासोबत बोललो असून त्यांनी असे काहीही नसल्याचे सांगतिले आहे.’, अशी माहिती अमरिंदर सिंग यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या