सिद्धूची मला काहीच अडचण नाही!

47

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

नवज्योत सिंग सिद्धू यांच्याबाबत माझ्या मनात कोणतेही आक्षेप नाहीत. मला त्याची कोणतीही अडचण नाही. मला आज सिद्धू यांचा राजीनामा मिळाला आहे. तो वाचून त्यावर काय निर्णय घ्यायचा हे ठरवले, असे पंजबाचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पंजाब सरकारमधील मंत्री सिद्धू यांच्या राजीनाम्याचे पत्र आजच आपल्या कार्यलयाला मिळाले आहे. ते वाचून त्यावर काय निर्णय घ्यायचा हे ठरवले जाईल. सिद्धू यांच्याबाबत माझ्या मनात कोणतेही आक्षेप नाहीत. याउलट राज्य मंत्रिमंडळाच्या खातेबदलात त्यांना महत्त्वाचे खाते देण्यात आले होते असेही सिंग यांनी सांगितले.  मी त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनादेखील कधीच विरोध केला नाही. उलट मी एकमेव आहे की, ज्याने राहुल गांधींकडे त्यांना भटिंडा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात यावी यासाठी शिफारस केली होती. मात्र तेव्हा सिद्धू  यांनीच त्यांची पत्नी भटिंडा येथून लढणार नसल्याचे सांगत त्या चंडीगढ येथून लढणार असल्याचे जाहीर केले होते. खरे तर हा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नव्हता, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या