नवनीत कौर राणा यांच्या निवडीला आव्हान, उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल

750
फाईल फोटो


सामना ऑनलाईन,अमरावती

नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत कौर राणा विजयी झाल्या होत्या. त्यांच्या निवडीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि अन्य एक याचिकाकर्ते सुनील भालेराव यांनी स्वतंत्ररित्या दोन वेगवेगळ्या याचिका दाखल केल्या आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. अपात्र “लुभाणा ” जातीच्या असलेल्या नवनीत कौर यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला आणि त्या विजयी झाल्या असं याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी असे करून मागासवर्गींचा संवैधानिक अधिकार  हिरावून घेतला असल्याचा आरोप याचिकांमध्ये करण्यात आला आहे, त्यामुळे नवनीत कौर राणा यांची निवड रद्द ठरवावी अशी मागणी याचिकांद्वारे करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या