आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना उच्च न्यायालयाची नोटीस

13484

बडनेरचे अपक्ष आमदार आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना 100 कोटी रुपयांची शासकीय जमीन बँकेत गहाण ठेवल्याच्या प्रकरणी नागपूरच्या उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बडनेरा येथील 100 करोड रुपयाची शासकीय जमीन मुंबई शिवाजी पार्क पंजाब नॅशनल बँकेत गहाण ठेवून कोट्यवधी रुपयाचे कर्ज काढणाऱ्या आमदार रवी राणा यांचे विरुद्ध जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मध्ये दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या झालेल्या सुनावणीत आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा व परिवारातील सदस्य आणि जिल्हाधिकारी महसूल आयुक्त आणि सचिवांना एकूण नऊ लोकांविरुद्ध उच्च न्यायालयाद्वारे नोटीसेस देण्यात आल्या असून चार हप्त्यांमध्ये उत्तर दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या