जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी 15 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सन 2021-22 या वर्षात जवाहर नवोदय विद्यालय, पुणे येथे इयत्ता 6 वी मध्ये प्रवेशासाठी दिनांक 10 एप्रिल 2021 रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी दिनांक 15 डिसेंबर 2020  पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य यांनी केले आहे.

प्रवेशासाठी विद्यार्थ्याचा जन्म  दिनांक 1 मे 2008 ते 30 एप्रिल 2012 (दोन्ही दिवस धरुन) या दरम्यान झालेला असावा. तसेच विद्यार्थी पुणे जिल्हयातील मान्यता प्राप्त शाळेत इयत्ता 5 वी मध्ये शिकत असावा.

आपली प्रतिक्रिया द्या