नऊ दिवस नऊ रंग- विजेते

सामना प्रतिनिधी । मुंबई

नवरात्रीच्या जागराला सुरुवात झाली आहे. नऊ दिवस मांगल्याने, चैतन्याने भरून जातील. उपवास, जागर, दांडिया-गरबा यांच्या जोडीला नवरंग…नऊ दिवस नऊ रंग. प्रत्येक दिवशी आदिशक्तीला विशिष्ट रंगाची साडी परिधान करायची आणि त्याचा पेहराव आपणही करायचा. या नवरंगात न्हाऊन निघायला तुम्ही सज्ज असालच. तुमची नऊ रंगातील साडीच्या पेहरावातीलच रोजची छायाचित्रे दैनिक ‘सामना’ च्या कार्यालयात पाठवा. आपण पाठवलेल्या फोटोमध्ये किमान पाच महिला असणे आवश्यक आहे. ही छायाचित्रे दैनिक ‘सामना’ आणि saamana.com मध्ये प्रकाशित करण्यात येतील. छायाचित्रांसोबत तुमच्या ग्रुपचे, संस्था वा कार्यालयाचे नाव लिहावे. चला तर मग नवरंगात रंगून जाऊया…

रंग जांभळा गुलाबी निळा लाल पांढरा  केशरी राखाडी/ग्रे हिरवा आणि पिवळाच्या विजेत्या

भाग्यवंतांना मिळणार रूपसंगमची साडी

दैनिक ‘सामना’त प्रसिद्ध होणाऱ्या छायाचित्रांतील दोन भाग्यवंत महिलांना दररोज दादर येथील प्रसिद्ध रूपसंगम यांच्या वतीने साडी देण्यात येणार आहे. दैनिक ‘सामना’तर्फे ही आगळी भेट देण्यात येणार आहे.

पत्ता :

दैनिक सामना, मुंबई विभाग, सद्गुरू दर्शन, नागुसयाजी वाडी, प्रभादेवी,
मुंबई- २५

ई-मेल आयडी:
[email protected], [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या