नवरात्र स्पेशल रेसिपी: घरातल्या घरात बनवा झटपट चिप्स

सामना ऑनलाईन। मुंबई

नवरात्रीचे नऊही दिवस काहीजण फराळाबरोबर बटाटे आणि केळ्याचे चिप्स खातात. बाजारात तयार चिप्स मिळत असल्याने बऱ्याच जणांची पसंती या तयार चिप्सला असते. तर काही दुकानदार हलक्या प्रतीच्या तेलात हे चिप्स तळत असल्याने अनेकांना त्याची अॅलर्जी होण्याची शक्यता असते. यामुळे ते बाजारात मिळणारे चिप्स खाणे टाळतात. पण खरं तर घरातल्या घरातही अशा चिप्स बनवता येतात.

साहित्य: चार मोठी कच्ची केळी, दोन वाटी तेल, चवीनुसार सैंधव मीठ, दोन चमचे काळी मिरी पावडर.

कृती: सर्वप्रथम केळी सोलून घ्यावीत. त्यानंतर एका मोठ्या पातेल्यात बर्फाचे पाणी घ्यावे त्यात ही केळी भिजत ठेवावी. १०-१२ मिनिटांनी केळी चिप्सच्या आकारात कापावीत. नंतर या चिप्स एका स्वच्छ कपड्यावर १० मिनिटे पसरवून ठेवाव्यात. त्यातील पाणी पूर्ण सुकल्यानंतर कडक तेलात सोनेरी होईपर्यंत तळाव्यात. त्यावर मीठ व काळी मिरी पावडर टाकावी. केळ्याच्या झटपट चिप्स तयार. थंड झाल्यावर हवा बंद डब्यात भरून ठेवल्यास बरेच महिने या चिप्स टिकतात.

आपली प्रतिक्रिया द्या