नवरात्र स्पेशल रेसिपी

सामना ऑनलाईन । मुंबई
आजपासून नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला आहे. या दिवसात अनेकजण नऊ दिवस उपास करुन देवीची करुणा भागतात. पण या नऊ दिवसात काय खावे हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो. यासाठी रोज एक याप्रमाणे नऊ दिवस नवरात्रीसाठी काही स्पेशल पण साध्या सोप्या रेसिपी देत आहोत.
शिंगाड्याची पुरी व बटाट्याची भाजी
पुरीसाठी साहीत्य – २५० ग्रॅम शिंगाड्याचे पीठ , १ ग्लास पाणी,  मीठ चवीनुसार, अर्धा चमचा काळी मिरी पावडर , ४-५ हिरव्या मिरच्या, वाटीभर तेल.
बटाट्याची भाजी साहीत्य – २५० ग्रॅम बटाटे, ८ हिरव्या मिरच्या, जिरे, दोन चमचे तेल.
कृती – पुरी करण्यासाठी सर्वप्रथम एका पसरट भांड्यात शिंगाडयाचे पीठ घ्या. त्यात मीठ, काळी मिरी पावडर, हिरवी मिरची व पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. पुऱ्या लाटाव्यात. त्यानंतर कढईत तेल घ्यावे. तेल कडकडीत गरम झाल्यावर त्यात पुऱ्या लालसर तळून घ्याव्यात.
बटाट्याच्या भाजीसाठी सर्वप्रथम बटाटे वाफवून घ्यावेत. थंड झाल्यावर सोलून त्याचे लहान तुकडे करावेत. कढईत तेल घेऊन त्यात गरम करावे. त्यात जिरे, बारीक कापलेली हिरवी मिरची घालावी, त्यानंतर बटाटयाचे तुकडे टाकून थोड मीठ टाकावे. पाच मिनिट परतत राहावे. गरमागरम पुरीबरोबर ही बटाट्याची भाजी छान लागते. त्यासोबत थंड ताक घ्यावे.