देशभरात विविध पध्दतीने साजरा होतो नवरात्रौत्सव

सामना ऑनलाईन। मुंबई

दुर्गा म्हणजे शक्ती. या शक्तीची आराधना देशभरात विविध पध्दतीने केली जाते. या पूजेच्या पध्दती या त्या ठराविक प्रांतांच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विविधतेवर अवलंबून असतात.

himachal

हिमाचल प्रदेश...ज्या दिवशी इतर राज्यांमध्ये नवरात्र संपते त्याच दिवशी हिमाचल प्रदेशमध्ये नवरात्रोत्सवास प्रारंभ होतो. याला कुलु दसरा असंही म्हणतात. सात दिवस हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी कुल्लुमध्ये रथ यात्रेचे आयोजन केले जाते. यात्रेत शेकडो पर्यटक सहभागी होतात.

himacha

कर्नाटकात नवरात्रोत्सवाला नादहाब्बा असेही म्हणतात. या दिवसात दुर्गा मातेची पूजा केली जाते. विजयनगर राजवटीपासून सुरु झालेली नवरात्रोत्सव साजरा करण्याची परंपरा आजही येथे कायम आहे. म्हैसूर याच ठिकाणी देवीने महिषासुराचा वध केला असे मानलं जात. त्यामुळेच या शहराला म्हैसूर हे नाव पडलं आहे. म्हैसूर संस्थानचा दसरा जगप्रसिध्द असून हजारो पर्यटक येथे हा सोहळा बघण्यासाठी दरवर्षी येतात.

keral-navratrustsav

केरळमध्येही नवरात्रोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा या देवतांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी हा सण उत्सवात साजरा करतात. उत्सवाच्या शेवटचे तीन दिवस भक्त बुध्दीची देवता असलेल्या देवी सरस्वतीची करुणा भागतात. मंदिर व घरातील देव्हाऱ्यातील सरस्वतीच्या तसबिरीसमोर पुस्तक व अभ्यासाचे साहीत्य ठेवले जाते. यामुळे देवीची कृपा होते तीचा आशिर्वाद लाभतो अशी येथील लोकांची श्रध्दा आहे.

tamil-navratr

तामिळनाडू, कर्माटकातील काही भाग व आंध्र प्रदेशात या उत्सवास बोम्मई कोलू असेही म्हणतात. तिथे हा रंगीबेरंगी बाहुल्यांचा उत्सव म्हणून ओळखला जातो. देवी देवतांच्या प्रतीकांबरोबरच प्राणी, पक्षी,शेतकरी यांच्याही बाहुल्या असतात. प्रत्येकजण घरात या बाहुल्या व्यवस्थित पणे सजवतो आणि मित्रपरिवारांना घरी आमंत्रित करतो. या बाहुल्यांना गोडाधोडाचा नेवैद्य दाखवला जातो.

punjab-navratri

पंजाबमध्ये नऊ दिवस नवरात्रोत्सव साजरी केली जाते. नवदुर्गेचे प्रतिक म्हणून अष्टमीच्या दिवशी नऊ कुमारिकांना घरी बोलवून पंचपक्वानांचे जेवण दिले जाते. त्यानंतर पैसे, कपडे व भेटवस्तू देऊन त्यांची पूजा केली जाते.

gujrat-nav

गुजरातमध्ये नवरात्रौत्सवात धूम असते.एका नक्षीदार मातीच्या मडक्यात दिवा ठेवला जाते. देवीच्या तसबिरीसमोर, कलशासमोर हा दिवा अखंड जळत ठेवला जातो. देवीसमोर गरबा खेळून रात्र जागवली जाते.

kolkata-nav

कोलकातामध्ये दुर्गेची पूजा नऊ दिवस केली जाते. रोज तिला नवीन पदार्थांचा नैवेद्य दिला जातो. यात मासेही असतात. नवमीचा दिवस खास असतो. या दिवशी सुवासिनी दुर्गेची ओटी भरतात.पण त्यांची पध्दत वेगळी असते. महिला आपल्या जवळचा सिंधूर देवीच्या भांगात भरतात. विड्यांच्या पानांनी तिची दृष्ट काढतात. तीला मिष्टी ( गोडाचा नेवैद्य) भरवतात. दुर्गेच्या मुर्तीसाठी लागणारी माती ही शरीर विक्रि करणाऱ्या महिलांच्या अंगणातून आणली जाते. बंगाली दुर्गा कधीही एकटी येत नाही तिच्यासोबत गणपति, कार्तिकेय, लक्ष्मी, आणि सरस्वतीही असतात.

आपली प्रतिक्रिया द्या