लोकधन; नवरात्र आणि लोकमानस

>>डॉ. संजय बोरुडे

नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. त्यामुळे आपल्यात नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे. ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते.

नवरात्र हा लोकधर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित शाक्त  व्रत आहे. लोकधर्मात नवरात्राचे दोन प्रकार मानले जातात. वासंतिक व शारदीय. पहिल्या नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व दुसऱया नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची अर्थात शक्तीची उपासना केली जाते.

नवरात्र हे शाक्तपंथीय मानले जाते. शारदीय नवरात्र  हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. हिंदुस्थानमध्ये सर्वत्र या नवरात्रामध्ये प्रत्येकाच्या कुलाचाराप्रमाणे पूजा-कृत्य घडते. दुर्गापूजा वर्षातून शरद  व वसंत ऋतूतही साजरी करण्याची प्रथा असल्याचे  दिसून येते.

आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची अर्थात आदिशक्तीची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव.

शेतीचा शोधच मुळात स्त्र्ााrने लावला. मातीतले नवनिर्माण स्त्र्ााrनेच पुरुषाला दाखवले. मातीच्या आणि  मातेच्या ठिकाणी असलेल्या अद्भुत सृजन शक्तीचे प्रतीक म्हणून  आपण घट बसवतो. घट बसवणे ही लोकाचारातील यातुकल्पना आहे. पावसाळा संपल्यावर शेत बहरू लागतं आणि तेव्हा हा सण साजरा केला जातो. घट म्हणजे पुंभ, पर्यायाने गर्भाशय. घट मातीवर बसवताना व त्याभोवती वेगवेगळ्या प्रकारचे धान टाकल्यानंतर नऊ दिवसांत ते उगवून येते. ज्या धान्याचे धान जास्त उगवून येते ते आगामी रब्बी हंगामात पेरायचे असे शेतकरी ठरवत असत. समाप्तीच्या दुसऱया दिवशी दसरा असतो. दसऱयाला आपण ते उगवलेले धान आपल्या टोपीत अथवा शिरस्त्र्ााणाला लावून सीमोल्लंघन करतो. मातृसत्ताक, गौरवशाली परंपरेचा वारसा सीमेपार नेऊन पोहोचवणे म्हणजे सीमोल्लंघन होय. वाईट विचारांचा त्याग आणि नव्या, सुज्ञ विचारांचा स्वीकार हाही एक अर्थ त्यामागे आहे. घटातून झिरपणाऱया पाण्याच्या संकल्पनेतूनच आजचे ‘सिंचन’ उगवले आहे.

पावसाळा बहुतेक संपलेला असतो. शेतातील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात. अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. देव्हाऱयात अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते. म्हणजे रब्बी हंगामाची सुरुवात ही नवरात्रानंतर केली जाते. कोणतेही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते, पण तिथीचा क्षय झाल्याने ते आठ दिवसांचे किंवा वृद्धी झाल्यास दहा दिवसांचे असू शकते. चंपा षष्ठाचे नवरात्र फक्त सहा दिवसांचे असते.

सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला ‘देवी’ असे नाव मिळाले आणि शाक्त संप्रदायी लोकांनी तिला सर्वश्रेष्ठ देवता, आदिमाया किंवा जगदंबा म्हणून गौरविले. देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पाहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा, भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.

नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. त्यामुळे आपल्यात नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे. ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते.

या काळात इतर सर्व देव झोपलेले आहेत असे मानले जाते. याच दिवसांत लोकायतिक तांत्रिक, मांत्रिक आपल्या जवळचे ज्ञान उजळवून घेतात. आपल्या शिष्याला एखादी गुप्त गोष्ट, ज्ञान गुरूने दिले नसेल आणि या काळात जर शिष्य गुरूसोबत असेल तर ते गुरू त्याला आपले गुह्यज्ञान देत असतो.

नवरात्रात आपण वेगवेगळ्या फुलांच्या माळा देवीला वाहत असतो.

पहिली माळ – पिवळ्या फुलांची माळ,

दुसरी माळ – पांढऱया फुलांची माळ

तिसरी माळ – निळ्या फुलांची माळ

चौथी माळ – केशरी अथवा भगवी फुले

पाचवी माळ – बेल किंवा पुंकवाची वाहतात

सहावी माळ – कर्दळीच्या फुलांची माळ

सातवी माळ – झेंडू किंवा नारिंगीची फुले

आठवी माळ – तांबडी फुले

नववी माळ – कुंकुमार्चन

या दिवसांत भाविकांनी देवीचे वेगवेगळे व्रत अंगिकारलेले असते. कोणी घरापासून देवीपर्यंत लोटांगण घालण्याचा, कोणी पायात चपला न घालण्याचे. स्त्री-पुरुष दोन्हीही उपवास करतात.

नवरात्रीच्या नऊ दिवसांत हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्या भोवती मुली फेर धरतात. पृथ्वीच्या सुफलीकरणाचा हा उत्सव मानला जातो. म्हणून याचे महत्त्व विशेष आहे. हत्ती हा समृद्धीचे प्रतीक मानला जातो तसेच वर्षन शक्तीचे प्रतीक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. घाटावरच्या कुमारिका पाटावर डाळ, तांदळाचा हत्ती मांडून त्याभोवती फेर धरून गाणे म्हणून पूजा करतात. या भोंडल्याचे स्वरूप हादगा, भुलाबाई असे प्रदेशानुसार बदलते.

भोंडला किंवा हादगा याला कृषी संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. महिलांच्या सुफलीकरणाचा विधी म्हणून याकडे पाहिले जाते.

भोंडला करताना म्हटली जाणारी गाणी ही महिलांच्या आयुष्याशी निगडित असतात. यावेळी म्हटली जाणारी गीते –

नमन गीत- 1. ऐलमा पैलमा गणेश देवा

माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा

माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी

पारवळ घुमती गिरिजा कपारी

अंकाणा तुझी सात वर्षं

भोंडल्या तुझी सोळा वर्षं

  1. वहाते मी हादग्या परी हादगा देव मी पूजिते सख्यांना बोलविते हादगा देव मी पूजिते लवंगा सुपाऱया वेलदोडे करून ठेविले विडे वहाते मी हादग्यापुढे हादगा देव मी पूजिते.

असे हे नवरात्र. नऊ रंगांतून फुलणाऱया नारी शक्तीचे. अलीकडे दांडियाच्या नावाखाली डीजे आणि नऊ रंगांच्या नऊ साडय़ा घालण्याचे स्तोम मात्र वाढले आहे आणि पारंपरिक भोंडला, फेराची गाणी लोप पावत चालली आहेत. तसेच 9 दिवस जीभ बांधून ठेवली म्हणून ऐन दसऱयाच्या दिवशी सकाळीच खाटकाच्या दुकानापुढे लागलेल्या रांगा  हे चित्रही सर्रास पाहायला मिळते.

(लेखक लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)

 [email protected]