आई महालक्ष्मीचा आशीर्वाद

 ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहवरील मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. निरागस स्वराजचे गाण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची धडपड आणि स्वराजला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नकळतपणे मदत करणाऱयाला मल्हार कामत प्रेक्षकांना भावतोय. या मालिकेच्या नवरात्री विशेष भागात मल्हार आणि स्वराजमधला असाच एक भावनिक क्षण अनुभवायला मिळणार आहे. मुंबईतल्या प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात याचे शूटिंग पार पडले आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या विशेष भागात स्वराज आणि मल्हारचे दिव्यांची आरास करताना दृश्य चित्रीत करण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे या भागात स्वराजची आई म्हणजेच अभिनेत्री उर्मिला कोठारेदेखील दिसणार आहे.