बॉलिवूडमध्ये घराणेशाहीपेक्षा वर्णभेद अधिक!

आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळ्यात ‘सीरियस मॅन’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीत नामांकन मिळाल्यामुळे नवाजुद्दीन सिद्दिकी सध्या चर्चेत आला आहे. यानिमित्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलीवूडमध्ये घराणेशाहीपेक्षा वर्णभेदाची समस्या अधिक असल्याचे नवाजुद्दीनने म्हटले आहे.

नवाजुद्दीन म्हणाला, मी गेली अनेक वर्षे वर्णभेदाविरोधात लढलो आहे. मला आशा आहे की, सावळ्या अभिनेत्रीला हिरोईनचे काम दिले जाईल. खरंतर ही काळाची गरज आहे. दर्जेदार कलाकृतीच्या निर्मितीसाठी हे भेदभाव दूर झाले पाहिजेत. मी सावळा आहे, उंची कमी आहे म्हणून मलाही अनेकदा नकार मिळाला आहे. पण आता मी त्याबद्दल तक्रार करू शकत नाही. परंतु इतर अनेक महान अभिनेते आहेत जे अजूनही अशा प्रकारच्या पक्षपातीपणाला बळी पडतात.

सुधीर मिश्रा दिग्दर्शित ‘सीरियस मॅन’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी आणि इंदिरा तिवारी मुख्य भूमिकेत आहेत. पुढे नवाजुद्दीन म्हणाला, सुधीर मिश्रा यांना चित्रपटाबाबत अफाट ज्ञान आहे, त्यांची विचारप्रक्रिया खूपच प्रॅक्टिकल आहे. इंदिरा पुन्हा एखाद्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली तर मला आनंदच होईल. सुधीरने तिची मुख्य भूमिकेसाठी निवड केली, पण इतरांचे काय… कारण बॉलीवूडमध्ये घराणेशाहीपेक्षा वर्णभेद अधिक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या