नवाजुद्दीन झळकणार रोमँटिक अंदाजात!

436

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या नव्या सिनेमाची घोषणा झाली आहे. ‘जोगिरा सारारारा’ असे सिनेमाचे नाव असून हा रोमॅण्टिक कॉमेडीपट आहे. यात नवाजुद्दीनसोबत नेहा शर्मा प्रमुख भूमिकेत आहे. सिनेमा व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

‘जोगिरा सारारारा’चे दिग्दर्शन कुशन नंदी करणार आहे, तर नदीम-ए-सिद्दिकी निर्माता आहेत. किरण श्याम श्रॉफ क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत. सिनेमाचे शूटिंग 2021मध्ये सुरू होणार असून लखनौ, बनारस, मुंबई येथे पार पडेल.

अलीकडेच नवाजुद्दीनची ‘रात अकेली है’ वेब सिरीज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. यात त्यांचा नेहमीसारखा दमदार परफॉर्मन्स बघायला मिळत आहे. तर नेहा शर्मा ही सिद्धार्थ शुक्लासोबत रोमँटिक म्युझिक व्हिडिओत दिसली होती. या जोडीच्या नव्या सिनेमाची आता प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या