नवाजुद्दीन सिद्दिकीच्या पत्नीने पाठवली घटस्फोटाची नोटीस

1682

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आपल्या लक्षवेधी भूमिकांमुळे प्रेक्षकांचा लाडका बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या व्यावसायिक आणि खासगी अशा दोन्ही पातळ्यांवर चर्चेत आहे. आता त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवल्याचं वृत्त आहे.

नवाजुद्दीन याची पत्नी आलिया हिने त्याला इमेल आणि व्हॉट्सअपच्या साहाय्याने ही नोटीस पाठवली आहे. 7 मे रोजी ही नोटीस पाठवण्यात आली असून नवाजुद्दीन याने अद्याप त्याचं उत्तर दिलेलं नसल्याची माहिती मिळत आहे. या नोटिसीद्वारे आलियाने घटस्फोट आणि त्यानंतर पोटगीची मागणी केली आहे. घटस्फोटाच्या कारणांचा खुलासा झालेला नसला, तरी तिने सिद्दिकी कुटुंबावर गंभीर आरोप केल्याची माहिती तिचे वकील अभय सहाय यांनी माध्यमांना दिली आहे.

सध्या नवाजुद्दीन त्याच्या गावी म्हणजे मुजफ्फरनगर येथे आहे. लॉकडाऊनमुळे तो मुंबईत अडकून पडला होता. मात्र, गावी त्याच्या लहान बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आईची तब्येत बिघडली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारकडून परवानगी घेऊन आणि सुरक्षेच्या सर्व उपाययोजना पाळून त्याने आपलं घर गाठलं होतं. त्यानंतर त्याने स्वतःला एका खोलीत क्वारंटाईनही करून घेतलं. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या