नक्षलग्रस्त भागात मुलांची मॅरेथॉन संपन्न, शांतता आणि एकोप्याचा संदेश

512

ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या प्रेरणेतून डॉ. के. व्ही. चारी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गडचिरोली येथे क्रीडा महोत्सव घेण्यात आला. यात व्हॉलीबॉल, कबड्डी या मैदानी खेळ ठेवण्यात आले होते. पण यात लक्षवेधी ठरली ती मॅरेथॉन. धानोरा तालुक्यात कचकल इथे ही स्पर्धा झाली. यात दुर्गम भागातील युवक-युवतींनी भाग घेतला.

नक्षलग्रस्त भागातील जंगलातील मार्गानं ही मॅरेथॉन झाली. नक्षल्यांची कोणतीही भीती न बाळगता स्पर्धक जोमानं धावले. यातून या भागात शांततेचा आणि एकतेचा संदेश देण्यात आला. या स्पर्धेत परिसरातील 27 गावांतील आदिवासी तरुण सहभागी झाले. या स्पर्धांमुळे खेळ भावनेसोबतच सांघिक भावनाही मजबूत होते. यातून निर्माण होणारी युवा वर्गाची ताकद विधायक कार्यासाठी वापरता येते. हाच स्पर्धेचा खरा उद्देश असल्याचे डॉ. राणी बंग म्हणाल्या.

दुर्गम भागातील युवकांमध्ये असलेली ऊर्जा अशा आयोजनातून विधायक वापरली गेली, तर वाम मार्गाला जाण्यापासून त्यांना रोखता येऊ शकतं. त्यामुळं अशा उपक्रमांचं आयोजन दुर्गम भागात होणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. राणी बंग यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या