नक्षलवाद्यांचा भाजप नेत्याच्या घरावर हल्ला, स्फोटकांनी घर उडवले

सामना ऑनलाईन । गया

माजी आमदार व भाजप नेते अनुज कुमार सिंह यांचे गयामधल्या डुमरिया येथील घरावार नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. नक्षलवाद्यांनी अनुज कुमार यांचे घर स्फोटकांनी उडवले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र स्फोटामुळे घराचे प्रचंड नूकसान झाले आहे.

बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भाजप नेते अनुज कुमार सिंह यांचे गयामधील घराचा काही भाग नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून उडवला. तसेच त्याठिकाणी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याबाबत पत्रक देखील ठेवलं आहे. दरम्यान, घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी गया पोलिसांचे पथक दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.