बंदोबस्तादरम्यान पोलिसावर नक्षलवाद्यांचा जीवघेणा हल्ला

16

सामना प्रतिनिधी । गडचिरोली

गट्टा आठवडी बाजारात बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर नक्षलवाद्यांनी जीवघेणा हल्ला केला आहे. एटापल्ली तालुक्यातील जांबीया गट्टा पोलीस मदत केंद्रांजवळील ही घटना आहे. या हल्लायत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डोंगी मट्टामी असं जखमी पोलीसाचं नाव आहे.

डोंगी मट्टामी यांना रविवारी (४ मार्च) गट्टा आठवडी बाजारात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलं होतं. बंदोबस्तादरम्यान एका नक्षलवाद्याने डोंगी यांच्यावर जीवे मारण्याचा उद्देशाने बंदूक उगारली. मात्र सुदैवाने बंदुकीत बिघाड झाल्यानं बंदुकीतून गोळी झाडणं नक्षलवाद्याला जमलं नाही. त्यावेळी त्या नक्षलवाद्यानं डोंगी यांच्यावर चाकूने हल्ला चढवला. या हल्लात डोंगी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरीता हेलिकॉप्टरने नागपूरला हलविण्यात आलं. याप्रकरणी जांबीय गट्टा पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या