नक्षलवाद्यांचा उत्पात, गडचिरोलीत वनविभागाचा डेपो पेटवला

सामना ऑनलाईन । गडचिरोली

महाराष्ट्रात नक्षलवाद्यांचा उत्पात सुरू असून त्यांनी गडचिरोली येथील वनविभागाच्या लाकडांचा डेपो मंगळवारी रात्री उशिरा पेटवून दिला. यामध्ये वनविभागाचे मोठे नुकसान झाले असले तरी निश्चित आकडा अद्याप कळलेला नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र आग इतकी भीषण होती की आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागली.

दरम्यान, मंगळवारी सकाळी पुण्यातील एल्गार परिषद, भीमा-कोरेगाव दगडफेकप्रकरणी नक्षलवादी कारवायांशी नाव जोडले गेलेल्या कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर पोलिसांनी मुंबई-पुण्यासह नागपूरमध्ये देखील धाडी टाकल्या होत्या. यामुळे बिथरलेल्या नक्षलवाद्यांनी हा प्रकार घडवून आणला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या