नयनतारा ‘या’ व्यक्तीशी लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा, कोण आहे ही व्यक्ती; वाचा सविस्तर बातमी

2745

तमिळ चित्रपटसृष्टीतील अत्यंत देखणी अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) ही प्रचंड प्रसिद्ध आहे. अभिनय आणि सौंदर्य यामुळे तिचे जगभरात असंख्य चाहते आहेत. 35 वर्षांची ही अभिनेत्री आता लग्नबंधनात अडकणार असल्याचे कळते आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याची चर्चा होती. हे दोघे अनेकदा एकत्र दिसले होते. अनेक चित्रपट पुरस्कार सोहळ्यांमध्येही दोघांना एकत्र पाहण्यात आलं होतं.

नयनताराचे यापूर्वी 4 जणांशी ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. यातील 2 प्रेमकरणे प्रचंड गाजली होती. सिंबू नावाच्या एका अभिनेत्यासोबत तिचे सर्वात आधी नाव जोडण्यात आले होते. या दोघांचे एकमेकांचे चुंबन घेतानाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. यामुळे नयनतारा भडकली होती आणि तिने यापुढे सिंबूसोबत कधीही काम करणार नाही असे जाहीर केले होते.

nayanthara

नयनताराचे सगळ्यात गाजलेलं प्रेमप्रकरण हे अभिनेता आणि दिग्दर्शक प्रभू देवासोबत होतं. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र त्यावेळी प्रभू देवा हा विवाहीत होता. नयनतारा त्याच्या प्रेमातच इतकी बुडाली होती की तिने त्याच्या नावाचा टॅटूही गोंदवला होता. 2010 साली हे दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे सगळ्यांना कळाले होते. या बातमीमुळे प्रभू देवाची बायको भयंकर चिडली होती. तिने न्यायालयात धाव घेतली आणि त्याद्वारे प्रभूदेवा आणि नयनतारा लग्न करू शकणार नाही अशा स्वरुपाचा आदेश प्राप्त केला. नयनताराचे खरे नाव डायना मरिअम कुरिअन होते. तिने ख्रिश्चिन धर्माचा त्याग करून जवळपास 3 वर्षांपूर्वी हिंदू धर्मात प्रवेश केला होता. तिने धर्म परिवर्तन प्रभू देवाशी लग्न करण्यासाठी केले होते असं म्हटलं जातं, मात्र तिने स्वत: याबाबत आजपर्यंत कोणतेही भाष्य केलेले नाहीये.

09. नयनतारा

नयनतारा ज्या व्यक्तीच्या प्रेमात आहे त्या व्यक्तीचं नावा निघ्नेश सिवन असं असून तो अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. गेली चार वर्ष तो आणि नयनतारा एकमेकांच्या प्रेमात आहे असं सांगितलं जात आहे. लॉकडाऊननंतर या दोघांच्या लग्नाचा बार उडणार असल्याचंही कळालं आहे. आपण एकमेकांच्या प्रेमात असल्याची जाहीर कबुली नयनताराने यापूर्वीच दिली आहे. तिने ही कबुली देण्यापूर्वी दोघांच्या फोटांवरून आणि सोशल मीडियातील पोस्टवरून दोघे एकमेकांच्या प्रेमात असावेत असा अनेकांनी अंदाज बांधला होता.

Naanum Rowdy Dhaan नानुम रावडी धान या चित्रपटापासून या दोघांमध्ये प्रेमांकुर फुलला असं सांगितलं जातं. या चित्रपटात नयनतारा प्रमुख भूमिकेमध्ये होती आणि चित्रपटाचं दिग्दर्शन विघ्नेशने केलं होतं. एका पुरस्कार सोहळ्यामध्ये नयनताराने ती विघ्नेशवर प्रेम करत असल्याची जाहीर कबुली दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या