ड्रग सप्लायर टोळी एनसीबीच्या ताब्यात; ड्रग खरेदी करताना टीव्ही अभिनेत्रीला पकडले

सध्या ड्रगचा मुद्दा गाजत आहे. बॉलीवूड कलाकारांना होणारा ड्रग पुरवठा आणि ड्रगचा गोरखधंदा चर्चेचा विषय झाला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) याबाबतच्या तपासात यश मिळाले आहे. एनसीबीने कारवाई करत बॉलीवूड कलाकारांना ड्रगपुरवठा करणाऱ्या टोळीला मुंबईतील वर्सोवामधून ताब्यात घेतले आहे. एनसीबीची कारवाई अद्याप सुरुच आहे.

या कारवाईवेळी एका टीव्ही अभिनेत्रीला ड्रग खरेदी करताना रंगेहात पकडण्यात आले. मुंबईतील वर्सोवामध्ये एनसीबीचे अधिकारी साध्या वेशात गेले होते. ड्रग पुरवठा करणाऱ्यांना संशय येऊ नये आणि कारवाई पूर्ण करण्यासाठी एनसीबीने काळजी घेतली होती. त्यात एनसीबीला यश आले. एनसीबीने ड्रग पुरवठा करणाऱ्या टोळीतील पाचजणांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईवेळी एका टीव्ही अभिनेत्रीला ड्रग पेडलरकडून ड्रग खरेदी करताना रंगेहात पकडण्यात आले. तिला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ड्रग पुरवठ्याचे हे वेगळे प्रकरण असून गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. बॉलीवूड कलाकरांना ड्रग पुरवठा करणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात एनसीबाला यश आले आहे. अटक केलेल्या पाचजणांची चौकशी सुरू असून अद्यापही एनसीबीची कारवाई सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या