सरकारच्या बोगस घोषणांचा निषेध, मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

विजय जोशी । नांदेड

नांदेडमधील कंधार येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्यांनी काळे झेंडे दाखवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी माजी आमदार शंकर धोंडगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या १५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्री आणि सरकारकडून फसव्या घोषणा करण्यात आल्या. धनगर, मराठा, मातंग, मुस्लीम समाजाला आरक्षणाची फसवी घोषणा केली. सरकारनं तरुणांना रोजगाराचं आमिष दाखवलं. या सर्व घोषणांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारनं सर्वांची दिशाभूल केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे. या फसव्या घोषणांचाचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांनी काळे झेंडे दाखवले. तसेच लिंबोटी धरणाचे पाणी उदगीर देण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे. या प्रकल्पालाही यावेळी विरोध करण्यात आला.