खासदार इम्तियाज जलील यांना अटक करा, अन्यथा रस्त्यावर उतरू! – मौलाना

3706

विधानसभा निवडणुकीत राडा करणारे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. जलील यांना अटक न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

विधानसभा निवडणूकप्रसंगी कटकटगेट येथे एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्धिकी आणि महाआघाडीच्या कार्यकत्र्यांत बाचाबाची होऊन किरकोळ वाद झाला होता. हे नमूद करून कदीर मौलाना म्हणाले, शहरात शांतता भंग होऊ नये यासाठी आम्ही पुढाकार घेतला. समजूत काढण्याचा प्रयत्नही केला. असे असताना खासदार इम्तियाज जलील यांनी घटनास्थळी येऊन राडा केला, असा आरोप त्यांनी केला. या दरम्यानच प्रतिकार करताना कोणीतरी खासदार जलील यांना मारले. त्यांना मारल्याचे आम्हालाही वाईट वाटले, मात्र खासदार म्हणून शांततेसाठी पुढाकार घेण्याऐवजी अशा प्रकारचा राडा करणार असाल तर लोक गप्प बसणार नाहीत. राडा करून शांतता भंग करणाऱ्यांना लोक मारतीलच, असेही कदीर मौलाना म्हणाले.

Video – संभाजीनगरमध्ये एमआयएम व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा

राडा करून शांतता भंग करणाऱ्या इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अन्यथा आम्हीही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही कदीर मौलाना यांनी प्रशासनास दिला आहे. याप्रसंगी ज्येष्ठ नेते व्दारकाभाऊ पाथ्रीकर, शहर जिल्हाध्यक्ष विजय सावळे, सरचिटणीस सुरजितसिंग खुंगर आदींची उपस्थिती होती.

संभाजीनगरात झालेल्या राड्याचा व्हिडीओ –

आपली प्रतिक्रिया द्या