छगन भुजबळांविरोधात पोलिसांत तक्रार, धमकी दिल्याचा तक्रारदाराचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भुजबळ यांच्या समर्थकांनी आपल्याला धमकावल्याचा तक्रारदाराने आरोप केला आहे. भुजबळ आणि अन्य दोघांविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात भा.दं.सं.च्या कलम 506 अंतर्गत ही तक्रार दाखल करून घेण्यात आली आङे. ‘भुजबळ यांनी हिंदू विरोधी विधाने केली होती, आणि त्यांच्या या विधानाचे व्हिडीओ भुजबळांना व्हॉटसअपवर पाठवल्याने त्यांना राग आला, या रागातून त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला धमकी दिली’ असा आरोप तक्रारदाराने केला आहे.