Video – पुनावाला यांना कोणीही बदनाम करत नाहीये – नवाब मलिक

केंद्राला 150 रुपये, राज्याला आधी 400 आणि नंतर 300 रुपये तर खासगी रुग्णालयांसाठी 700 रूपये लस देण्याचे पुनावाला यांनी जाहीर केले हा सगळा संशय निर्माण करणारा विषय असून याला अदार पुनावाला स्वतः जबाबदार आहेत त्यांना कोण बदनाम करत नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

मलिक म्हणाले “पुनावाला यांनी  सुरुवातीला राज्याला 400 रुपयांनी लस देणार असल्याचे सांगितले मग त्यांनी 300 रुपये भाव स्वतः जाहीर केला. हे सगळं संशय निर्माण करणारे विषय आहेत.” ज्यापध्दतीने 400 रुपये किंमत ठरवतात आणि नंतर ट्वीट करुन 300 रुपयाला द्यायला तयार आहे असे सांगितले. हा जो संशय निर्माण होतोय त्यामुळे देशातील जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या